आत्महत्या मराठी निबंध | Suicide Essay in Marathi

 वाढत्या आत्महत्या व स्त्री निबंधस्त्रियांच्या वाढत्या आत्महत्येला अनेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारणे म्हणजे संशयी स्वभाव, हट्टीपणा व जिद्द, सुखी जीवन जगण्याच्या काल्पनिक कल्पना, माहेरच्या माणसांचे पाठबळ नसणे, मानसिक रोग, अहंकार, दुसन्याची बरोबरी करण्याची वृत्ती, सुसंवाद न साधण्याची वृत्ती अशी विविध कारणे त्यात समाविष्ट असतात. अनेक स्त्रिया ह्या सोशिक स्वभावाच्या असल्याने कोणत्याही अडचणींना शांतपणे तोंड देतात, पण काही स्त्रिया अति संवेदनशील असतात. ही अतिसंवेदनशीलता आत्महत्येचे कारण ठरू शकते. तरुण स्त्रियांमध्ये हे प्रमाण अधिक प्रमाणात जाणवते. भावूक होऊन किंवा रागाने आत्महत्येचा विचार येणे व त्याप्रमाणे वागणे हे या प्रकारात मोडते. एखादा बरा न होणारा आजारही कारणीभूत ठरतो. रूढीप्रिय स्त्रियांच्या समस्या ह्या अधिक जटील असतात. रॉकेल ओतून पेटवून घेणान्या स्त्रियांचे प्रमाण हल्ली वाढलेले आहे आणि हुंडाबळीचे कायदेशीर लेबल लावले जाऊन त्यामागील परिस्थितीचा विचार न करता किंवा संशोधन न करता सासरच्या मंडळींना शिव्याशाप देऊन तरुण मुलगी गेली, ह्याची हळहळ समाज व्यक्त करतो.

प्रत्येक गोष्ट अधिकारवाणीने विचारण्याची बायकांची सवय असते तर पुरुष स्वभावतः किंवा कधी कधी परिस्थितीमुळे चिडून उत्तरे देतो. अशा वेळी आपल्या वागण्यात बदल घडवून आणणे हे स्त्रियांचे कर्तव्य नाही का? तेव्हा स्त्रियांनी विचारण्याच्या पद्धतीत बदल करायला हवा! हुंडाबळीच्या बातम्या आपण रोज वर्तमानपत्रात वाचतो. तिचा बळी घेणारी तिची सासरची माणसं? दिल्या घरी तू सुखी राहा, असे सांगून तेच तुमचं घर म्हणूनही माहेरचे समजावतात. मदत करता येण्यासारखी असली तरी ते करत नाहीत. कारण सासर सोडून माहेरी आलेल्या मुलीकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अतिशय वाईट आहे आणि आयुष्यभर पोसण्याची जबाबदारी घेणेही कठीण असते. म्हणून मुलीला माहेरी आणत नाही. त्यामुळे मुलीला आपले कोणीच नाही असे वाटते. म्हणून मुलींना शिक्षण देऊन लग्नाआधी स्वावलंबी बनविणे ही आजच्या काळाची गरज आहे. तसेच स्त्रियांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीची इतरांकडून प्रशंसा व्हावी, समाजाकडून व घरच्या मंडळींकडून त्यावर शिक्कामोर्तब व्हावे असेच त्यांना वाटते, परंतु दरवेळी असे न घडल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग होतो. ह्याचे कारण तारतम्यपणा नसल्यामुळे असे गैरसमज करून घेतात. त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती असणारच असे समजून स्त्रियांनी आपल्या भूमिकेत बदल करणे आवश्यक आहे. स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ फक्त पुरुषांची असलेली कामे करणे एवढाच मर्यादित नाही. बरोबरी म्हणता दोघांचीही सामाजिक, आर्थिक, बौद्धिक पातळी सारखीच असायला हवी.. स्त्री व पुरुषांची कार्यक्षेत्रे मित्र असली तरी दोघांची कार्य करण्याची क्षमता सारखीच मानली पाहिजे, तसेच संसार चालवण्यासाठी परस्पर सामंजस्य महत्त्वाचं ठरतं. एकवेळ पैसा कमी असला तरी दिमाखाने आणि एकमेकांच्या साथीने संसार चालवता येतो. पण दोघांत सामंजस्य नसेल तर कलहाला वेगळं रूप मिळतं. त्यात स्त्रियांचा अहंकार महत्त्वाची भूमिका बजावते, म्हणून त्याला तिलांजली दिली नाही तर आत्महत्येत त्याचे रुपांतर होते.

आज सुधारलेल्या तरुणी म्हणून ज्या तरुणी आपल्यासमोर येतात त्यांच्यावर पाश्चात्य विचार, जीवनशैली, स्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पना यांचा पगडा अधिक्याने दिसून येतो. स्त्री देहाच्या मोकळ्या-ढाकळ्या राहणीमानाची वृत्ती, चित्रपटातील उत्तानता आणि विविध दूरचित्रवाहिन्यांतून शरीरभावना उद्दिपित करणाऱ्या जाहिराती पाहून त्यांच्या जाणिवा फुलून आलेल्या असतात. आधुनिकता व स्त्री स्वातंत्र्याचा भलताच अर्थ या पिढीने लावून घेतला आहे. ह्यातूनच उद्याचा मूल्यहीन समाज घडतो आहे, ह्याचे भानही स्त्रियांना राहिलेले नाही. त्यामुळे लग्नानंतर त्यांचे कोणाशी पटत नाही. त्या दुसऱ्यांना समजून न घेता सुखी जीवन जगण्याच्या कल्पना लादतात व त्यातून वाद वाढून विकोपाला जाऊन अहंकार न सोडल्यामुळे प्रकरण आत्महत्येपर्यंत येऊन पोचते; कारण ह्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असल्यामुळे त्या नेहमी नकारात्मक विचार करीत असतात, भीती, घृणा, वाईट विचार,

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ